Breaking News

भारताची ‘विजया’दशमी, पहिल्या कसोटीत आफ्रिकेवर दणदणीत विजय

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था

भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत मात करीत मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी नऊ बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या संघाने दोन सत्रांमध्येच विजय साकारला.दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी (5/35) आणि रवींद्र जडेजा (4/87) यांच्या घातक फिरकी गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे एकामागोमाग एक असे सात फलंदाज तंबूत धाडले. विजयासाठी केवळ दोनच बळी दूर असताना भारताने दुसर्‍या सत्रात 22 षटके फेकत सामन्यावर आपले नाव कोरले. या सामन्यात आठ बळी मिळवणार्‍या रविचंद्रन अश्विनने सर्वांत जलद 350 बळी मिळविण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply