रायगड : जिमाका
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांसाठी रेणू जयपाल (आयएएस), बी. परमेसवरन (आयएएस) आणि एस. हरिकिशोर (आयएएस) यांची साधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 7) त्यांचे स्वागत केले. पनवेल व कर्जत मतदारसंघासाठी रेणू जयपाल सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आहेत. त्यांच्या संपर्क अधिकारी शशीकला अहिरराव असून त्यांचा संपर्क क्रमांक 7507251511, 8208123951 असा आहे. बी. परमेसवरन हे उरण व पेण मतदारसंघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आहेत. श्री. बनसोडे हे त्यांचे संपर्क अधिकारी असून त्यांचा संपर्क क्रमांक 9619368365 असा आहे. अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदारसंघासाठी एस. हरिकिशोर हे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आहेत. त्यांचे संपर्क अधिकारी रमेश पंडितराव पाटील असून त्यांचा संपर्क क्रमांक 8108022010 असा आहे.