सेल्फी काढताना पर्यटक पडला दरीत

रेस्क्यू टीमने सुखरूप काढले बाहेर

कर्जत : बातमीदार

देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची प्रचिती माथेरानमध्ये पाहायला मिळाली. सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन एक पर्यटक 400 फूट खोल दरीत पडला, मात्र येथील रेस्क्यू टीमने त्याला सुखरूप बाहेर काढले. अजित प्रभाकर बर्वे (वय 62, रा. विलेपार्ले, मुंबई) असे या पर्यटकाचे नाव असून, ते दोन दिवस माथेरानमधील एका हॉटेलमध्ये एकटेच राहत होते. गुरुवारी (दि. 10) सकाळी साडेनऊ वाजता अजित माथेरानमधील एको पॉइंट फिरण्यासाठी गेले होते. सुरक्षा कठडे ओलांडून मोबाइलने सेल्फी काढत असताना गवत ओले असल्याने त्यांचा पाय घसरला व ते 400 फूट खोल दरीत कोसळले, मात्र दैव बलवत्तर म्हणून ते डोंगराच्या अर्ध्यात अडकून राहिले व वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागले.त्यानुसार या पॉइंटवर असलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितले. पोलीस हवालदार सुनील पाटील, नारायण बार्शी, पोलीस नाईक महेंद्र राठोड, पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड, राहुल पाटील, राहुल मुंढे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी रेस्क्यू टीमचे सुनील कोळी, सुनील ढोले, अमित कोळी, अक्षय परब, उमेश मोरे, संतोष केळगणे, अमोल सकपाळ, दिनेश सुतार यांना पाचारण केले. त्यांनी दरीत दोरीच्या सहाय्याने उतरून तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अजित यांना सुखरूप बाहेर काढले. पोलिसांनी त्यांना येथील बी. जे. रुग्णालयात दाखल केले.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply