पोदी भागात भाजपची प्रचारात आघाडी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल विधासभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथील पोदी या परिसरात गुरुवारी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार करण्यात आला.

भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या माहयुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी पोदी येथे आयोजित केलेल्या प्रचार रॅलीस पनवेल महापलिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, प्रभाग समिती ड अध्यक्ष तेजस कांडपिळे, भाजप नेते अरुण घरत, कमलाकर घरत, माजी नगरसेवक अजय कांडपिळे, जयवंत महामुनी, किशोर मोरे, जयराम मुंबईकर, युवानेते साहील मोरे, महिला मोर्चाच्या नीता घाटुगडे, सुजाता पाटील, सुधा सिन्हा, अनिता घाटुगडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply