Breaking News

प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप प्रवेशाचा धडाका

नाभिक समाजातील बंधू-भगिनींचा प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची विकासकामे, तसेच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहर व परिसरातील नाभिक समाजाच्या असंख्य बंधू-भगिनींनी सोमवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.

पनवेल तसेच कामोठे, कळंबोली येथील नाभिक समाजाच्या स्नेहल खरे, संजिता पवार, श्वेता सकपाळ, निर्मला तळेकर, ललिता अहिरे, सदाशिव चातुर्य, विनीत चातुर्य, अविनाश पवार, सुलोचना पवार, कल्पेश पवार, भगवान जगताप, किरण जगताप, वृषाली जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, भाजप नेते भीमसेन माळी, शिवाजी दुर्गे, दिलीप खानावकर, एस. डी. हावलदार, चंद्रशेखर जळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी, काँग्रेसला धक्का

मोठा खांदा येथे प्रवेश सोहळा

भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहाता विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत राष्ट्रवादी आणि मोठा खांदा येथील काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोमवारी जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सर्व प्रवेश कर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.

पनवेल येथील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते अशोक जानोश्कर यांनी, तसेच मोठा खांदा येथील काँग्रेसचे अ‍ॅडव्होकेट संतोष भगत, अविनाश कोंडे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, भाजप नेते भीमसेन माळी, शिवाजी दुर्गे, दिलीप खानावकर, नगरसेवक अ‍ॅडव्होकेट मनोज भुजबळ, कामगार नेते सुरेश पाटील, चंद्रशेखर जळे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हरिग्राम, टेंभोडेेतील शेतकरीही भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील हरिग्राम आणि टेंभोडे गावातील शेतकरी कामगार पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सोमवारी जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देत प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

पनवेलमधील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी हरिग्राम येथील शेकापचे दत्ता वाघमारे, राजेश वाघमारे, पप्या वाघमारे, जयराम वाघमारे, कैलास वाघमारे, महेश वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, तसेच टेंभोडे येथील शेकापचे शंकुनाथ गडगे, चेतन गडगे, महेश गडगे, गणेश गडगे, वीरेंद्र पाटील, उमेश उबाले, विकी गडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी.  देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, भाजप नेते भीमसेन माळी, शिवाजी दुर्गे, टेंभोडेचे माजी सरपंच के. के. कडव, अशोक गडगे, पनवेल तालुका चिटणीस रवींद्र पाटील, प्रभाग क्रमांक 9चे अध्यक्ष सचिन चौधरी, संतोष भोईर, शरद भोईर, महेंद्र गडगे, विश्वास म्हात्रे, श्रीनिवास म्हात्रे, धनाजी म्हात्रे, दत्ता म्हात्रे, अरविंद भोपी, दत्ता भोपी, रमेश म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply