Breaking News

ज्येष्ठ नागरिकांत मतदार जनजागृती

उरण ः रामप्रहर वृत्त

उरण मतदारसंघांतील ज्येष्ठ नागरिकांना मतदार जनजागृती अभियानांतर्गत मतदानाचे महत्त्व स्पष्ट करून प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. मतदार हा लोकशाहीचा आधार, ही घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, मार्गदर्शक म्हणून संतोष पवार, मतदार जनजागृती अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या वेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणारच, असे सांगितले. अशा प्रकारे अनेक ठिकाणी मतदानसंबधी जनजागृती केली जात आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply