Breaking News

आर्चरी स्पर्धेत गुरुकुल स्कूलच्या नियम विराणीचे सुयश

मोहोपाडा ः वार्ताहर

शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे विभागस्तरीय आर्चरी स्पर्धा 2019चे आयोजन शनिवारी (दि. 19) प्रबोधन क्रीडा भवन गोरेगाव- मुंबई येथे करण्यात आले होते. यामध्ये चौक येथील श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या  नियम विराणी या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन करून आपल्या विशेष प्रावीण्याच्या जोरावर धुळे येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. तसेच या विभागस्तरीय स्पर्धेसाठी शाळेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यामध्ये दीप राजपूत, सिद्धार्थ अवसरे, प्रियंका ठवणी, धीरज भोईर यांचा समावेश होता. या वेळी नियम विराणी याची धुळे येथे होणार्‍या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली असून नियमने आर्चरीच्या अधिक सरावाला सुरुवात केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक प. पू. योगेश्वर स्वरूपदास स्वामी, प. पू. आत्मस्वरूपदास स्वामी, तसेच प्राचार्य जॉन्सन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन व कौतुक केले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply