Breaking News

नवी मुंबईतील दोन्ही जागांवर महायुती विजयी

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्हीही मतदार संघात एकतर्फी विजयश्री खेचत महायुतीचे दोन्हीही उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. विशेष म्हणजे महाआघाडी व इतर पक्षाच्या उमेदवारांना महायुतीच्या दोन्हीही उमेदवारांना जवळपासही मतदान झाले नाही. त्यामुळे नवी मुंबईतील दोन्हीही मतदारसंघात महायुतीचा जोर दिसून आला. महत्वाचे म्हणजे निवडून आलेल्या दोन्ही पैकी एक उमेदवार यंदा तर एक उमेदवार मागील विधासभा निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले आहेत. बेलापूर व ऐरोली या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे मंदाताई म्हात्रे व गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार म्हणून उभे होते. तर मनसेकडून अनुक्रमे गजानन काळे तर नीलेश बाणखेळे तर महाआघाडीकडून अशोक गावडे व अनोळखी गणेश शिंदे यांना उमेदवारी दिली गेली होती. वंचित बहुजन आघाडीकडून ऐरोलीसाठी डॉ. प्रकाश ढाकणे तर बेलापूरमधून वंचित बहुजन आघाडीकडून विरेंद्र लगाडे याना तिकीट मिळाले होते. परंतु ते वेळेत निवडणूक कार्यालयात पोहचले नसल्याने त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. महायुती उमेदवारांच्या तुलनेत इतर उमेदवार हे नवखे व बलाढ्य नव्हते. परंतु विधानसभेचे बिगुल वाजल्यावर व जागा वाटपात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. यावर नाराजी नाट्यानंतर निवडणुकीत रंगत येईल, असे एकंदरीत वाटत होते. परंतु ज्याप्रकारे  निवडणुकीचे निकाल आले, त्यावरून शिवसेनेची मते थोडीफार वगळता महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्याप्रकारे मिळाल्यामुळे तुलनात्मक महायुतीच्या एकही उमेदवाराच्या आसपासही पोहचल्याचे दिसून येत नाही. ऐरोलीमधून लढलेल्या गणेश नाईक यांना 1 लाख ,14 हजार, आडोतीस तर महाआघाडीच्या गणेश शिंदे यांना 35 हजार आठशे दहा,तर मनसेच्या नीलेश बाणखेळे यांना 23 हजारच्या आसपास तर वंचित आघाडीला 13 हजार व नोटाला 5 हजारच्या वर मते पडली. त्यामुळे गणेश नाईक यांचा विजय 80 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने झाला. बेलापूर मतदारसंघात महायुतीच्या  मंदाताई म्हात्रे याना 80 हजार, आघाडीच्या अशोक गावडे यांना 41 हजार, मनसेच्या गजानन काळे याना 25 हजार तर नोटाला 3600 मत मिळाली. तर मंदाताई म्हात्रे या 45 हजार पेक्षा जास्त मत घेऊन पुन्हा एकदा आमदारकीपदी विराजमान झाल्या.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply