रेवदंडा : प्रतिनिधी
चालकाचे नियत्रंण सुटल्याने मंगळवारी (दि. 5) दुपारी रेवदंडा बायपास रस्त्यावरून जाणारी दुचाकी घसरून झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार जबर जखमी होऊन मृत्यू पावला. रेवदंडा मोठे बंदर येथील येशुदास जॉन फर्नांडिस उर्फ बाबू हा मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (एमएच-06, बीसी-4624) रेवदंडा बायपासने जात होता. एका वळणावर नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याखाली गेली. या अपघातामध्ये येशुदास याचे डोके झाडावर आदळल्याने तो जबर जखमी होऊन मृत पावला. या अपघाताची नोंद रेवदंडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.