Breaking News

सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या योजनेंतर्गत एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय एकात्मता शिबिर झाले. देशभरातून 600 कॅडेट्सने या शिबिरात सहभाग घेतला. या शिबिराचा समारोप संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

या शिबिरास मेजर जनरल गजेंद्र प्रसाद, कमांडर आर. एस. दहिला, सुनील बालकृष्णन, कॅम्प कमांडर ब्रिगेडिअर जी. एस. चीमा, कर्नल अमित बागी, मेजर रिचा शर्मा, एनसीसी अधिकारी कॅ. डॉ. भंडारे, डॉ. नीलिमा तिदार, मंबई ‘ए’ ग्रुपचे एनसीसीचे अधिकारी, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात योग, मुंबई दर्शन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पॅरासेलिंग, स्वसंरक्षण, मानवी मूल्य विकास, चित्रकला अशा अनेक गोष्टींसह विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने झाली. शिबिराची सांगता महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Check Also

आशा सचदेव सत्तरीत, चित्रपटसृष्टीत पन्नाशी

आजच्या मल्टीप्लेक्स युगातील जेन झी पिढीला हिंदी चित्रपटसृष्टीतील आशा सचदेव नावाची अभिनेत्री माहीत असण्याची शक्यता …

Leave a Reply