Breaking News

घारापुरीवरील पुरातत्त्व विभागाच्या तिकीट कार्यालयाचे उद्घाटन

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील जगविख्यात असलेल्या घारापुरी बेटावरील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या तिकीट कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले. घारापुरी येथे भारतीय पुरातत्त्व विभाग आकारत असलेल्या पर्यटक कराच्या कार्यालयाचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले आहे.नव्याने नुतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या वेळी भारतीय पुरातत्त्व विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर आदी उपस्थित होते.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply