Breaking News

आयपीएलपर्यंत वाट बघा; धोनीच्या, निवृत्तीच्या चर्चांवर रवी शास्त्रींचे सूचक विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्याच्या शक्यता धुसर झालेल्या आहेत, मात्र अशा परिस्थितीत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केले आहे.

तो पुन्हा कधी खेळायला सुरुवात करतोय आणि आयपीएलदरम्यान कसा खेळ करतोय यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. सध्याच्या यष्टीरक्षकांची कामगिरी आणि धोनीची कामगिरी या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील. आयपीएल ही मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतरच तुमचा विश्वचषकासाठीचा 15 जणांचा संघ कमी-अधिक प्रमाणात पक्का होईल, असे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले.

2020 सालात आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. याबद्दल बोलत असताना शास्त्री म्हणाले, एखादा खेळाडू दौर्‍यात जखमी झाला, तर पर्यायी खेळाडू म्हणून काहींचा विचार होऊ शकतो, मात्र तो खेळाडू कोण असेल याविषयी अंदाज बांधत राहण्यापेक्षा आपण आयपीएलपर्यंतची वाट पाहूया. यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply