Breaking News

शिवसैनिकाला ‘10 जनपथ’वर नाक रगडावे लागेल -गिरिराज सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भाजपची साथ सोडत व एनडीएमधून बाहेर पडत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेवर केंद्रीय मंत्री व भाजप नेते गिरिराज सिंह यांनी घणाघात केला आहे. आता शिवसैनिकाला प्रभू रामाचे नाव घेण्यासाठी सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथवर नाक रगडावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. शिवसेनेने बाळासाहेबांच्या आत्म्यास सोनिया गांधी यांच्या हस्ते गहाण ठेवले आहे. आता शिवसैनिकाला प्रभू राम आणि अयोध्येचे नाव घेण्यासाठीदेखील 10 जनपथवर नाक रगडावे लागेल. शिवसेनेला पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, कशा प्रकारे मुघलांनी भारतात आपले पाय पसरले असतील? असे गिरिराज सिंह यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply