Breaking News

रोहित मोडेल लाराचा विक्रम, डेव्हिड वॉर्नरकडून रोहितचे कौतुक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात नाबाद त्रिशतकी खेळी करणार्‍या डेव्हिड वॉर्नरने भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माचे कौतुक केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रायन लाराचा सर्वोच्च 400 धावांचा विक्रम रोहित शर्मा मोडू शकेल, असे वक्तव्य डेव्हिड वॉर्नरने केले आहे.

वॉर्नर 335 धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आपल्या संघाचा डाव 589 धावांवर घोषित केला. वॉर्नर ब्रायन लाराचा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या 65 धावा दूर असताना ऑस्ट्रेलियन कर्णधाराने डाव घोषित केल्यामुळे त्याच्यावर टीकाही करण्यात आली. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना वॉर्नरने आपली बाजू स्पष्ट केली.मला वाटते हा निर्णय प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. ऑस्ट्रेलियन मैदानांच्या सीमारेषा या खूप दूर आहेत. त्यामुळे एका क्षणानंतर तुम्हाला थकवा येतो आणि तुम्हाला मोठे फटके खेळता येत नाहीत. त्यामुळे काही क्षणानंतर मी एक-दोन धावा काढण्याकडे भर दिला, मात्र एक दिवस रोहित शर्मा ब्रायन लाराचा विक्रम मोडू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Check Also

देशाचे प्रधानसेवक म्हणून नरेंद्र मोदी कार्यरत -मंत्री ॲड. आशिष शेलार

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे प्रधानसेवक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. म्हणूनच जनतेचा त्यांच्यावर …

Leave a Reply