Breaking News

पनवेलमध्ये रक्तदान शिबिर

नगरसेवक राजू सोनी यांचे लाभले विशेष सहकार्य

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कच्छ युवक संघ पनवेल जायंट ग्रुप ऑफ पनवेल व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने एंकरवाला रक्तदान अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. जैन स्थानिक कापड बाजार पनवेल येथे  झालेले शिबीर यशस्वी होण्यासाठी नगरसेवक राजू सोनी यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबीरास नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबीरामध्ये रक्तदानासोबतच प्रिन्स अंगदान जागृती अभियानांतर्गत  अ‍ॅारगन डोनेशनसाठी रजिस्ट्रेशन  करण्यात आले. यावेळी कच्छ युवक संघ पनवेलचे ब्लड डोनेशन कनव्हेनर राजेश जोशी, ऑरगन डोनेशन कनव्हेनर गिता ठक्कर,डॉक्टर शुभंकर आगलावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …

Leave a Reply