म्हसळा : प्रतिनिधी
जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने मंगळवारी (दि. 3) म्हसळे नं 1 शाळेने रॅलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी रॅलीत घोषणा देऊन समाजामध्ये जनजागृती केली. दिव्यांगांबद्दल सहानुभूती नव्हे तर विश्वास दाखवा, असे मत म्हसळा गटसाधन केंद्राचे विशेष तज्ज्ञ उमेश गोराडे यांनी या वेळी व्यक्त केले. जागतिक दिव्यांग दिन रॅलीमध्ये म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक विष्णू संभारे, डॉ. स्मिता पाटील, वैशाली पाटील, समीक्षा मांजरेकर, वारेशी पुष्पा, शीतल लेंढे, मुकेश जंगम यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी डायटचे विषय सहाय्यक उलडे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर गटसाधन केंद्रातील दीपक पाटील, संदीप भोंनकर, सलाम कौचाली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शुभदा दातार, सुमित्रा खेडेकर, राजेंद्र मालुसरे, कल्पना पाटील, वंदना खोत यांनी शहरातील सर्व मार्गांवर रॅली, कॉर्नर व चौकांतून जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन दिव्यांग दिन यशस्वी केला. अनिल बेडके यांनी आभार मानले.