अलिबाग ः प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्रात मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील राबविण्यात येत असलेल्या एसआयआरच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी सोमवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, माजी खासदार किरीट सोमय्या, धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटील, पनवेल विधानसभा क्षेत्र बीएलए-१ प्रमुख व नगरसेवक परेश ठाकूर आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांच्या २००२च्या मतदार यादीतील माहितीसोबत करण्यात आलेल्या मॅपिंगची महिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात ६०.८४ टक्के मतदारांचे मॅपिंग करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper