पनवेल महापालिका विकसित करणार महिला सुरक्षेसाठी अद्ययावत अॅप

आयुक्त गणेश देशमुख यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

पनवेल ः प्रतिनिधी

महिला सुरक्षेसाठी पनवेल महापालिका एक अद्ययावत अ‍ॅप विकसित करणार असल्याचे आश्वासन आयुक्त गणेश देशमुख यांनी खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले. महिलांवर होणारे अत्याचार आणि प्राणघातक हल्ल्यांमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. निर्भया आणि डॉ. प्रियांका रेड्डी यांच्याबाबत झालेल्या दुर्घटनेनंतर महिलांत असुरक्षिततेची भावना अधिकच वाढीस लागली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात अशा दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात व त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे शक्य आहे, यासंदर्भातील सूचनांचा समावेश असलेले एक निवेदन खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि. 4) आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आले. या वेळी महिला सुरक्षेसाठी लवकरच अद्ययावत ’अ‍ॅप’ विकसित करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी या शिष्टमंडळाला दिले. यावेळी महापालिका आयुक्तांनी खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाशी महिला सुरक्षा संदर्भातील विविध मुद्यांवर चर्चा केली. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद मिळण्यासाठी अद्यावत ऑनलाइन पोलीस अ‍ॅप विकसित केले जावे, सध्या नवी मुंबई पोलिसांच्या वेब पोर्टलवरील ’अ‍ॅप’ अपडेट करण्याची नितांत गरज आहे, पनवेल महापालिकेच्या महिला व बालविकास विभागाने परिस्थिती टाळण्यासाठी व त्वरित निराकरण करण्यात हेतूने मुलींना सक्षम व महिला संरक्षणाबाबत विविध ठिकाणी कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावे, स्त्रियांचे संरक्षण विषय सोडविण्यासाठी पनवेलच्या महिला व बाल विभाग आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा अदालत स्थापन करण्यात यावी, अशा प्रकारच्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आयुक्त देशमुख यांनी सुध्दा असोसिएशनच्या सुचवलेल्या उपाययोजना स्वागतार्ह असल्याचे सांगत महापालिकेच्या विचाराधीन असलेल्या काही उपाययोजना लवकरच अंमलात आणल्या जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानवडे, उपाध्यक्ष इम्तियाज शेख, सचिव गिरीष दिवेकर, महिला सेलच्या अध्यक्षा बींदू चंद्रप्रकाश, मिनाली पांडे, विभूती खेडेकर, अंजली गुप्ता व इतर महिला सदस्या उपस्थित होत्या.

महापालिकेच्या वतीने विचाराधीन असलेल्या उपाययोजना

1. पनवेल महानगरपालिका लवकरात लवकर महिलांसाठी एक अद्ययावत मदत मोबाईल अ‍ॅप विकसित करून घेणार आहे. हे अ‍ॅप चंडीगड आणि हरियाणा राज्याने विकसित केलेल्या या तत्त्वावर असेल. या अ‍ॅपद्वारे, पीडित व्यक्ती तीव्र आपत्कालीन परिस्थितीत एक छोटासा बटण दाबून, संपूर्ण सुरक्षा प्रणालीला सतर्क करू शकणार आहे.

2. पनवेल महानगरपालिका प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये महिला संरक्षण, कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करणार आहे.

3. दुर्गम आणि निर्जन भागांमध्ये पनवेल महानगरपालिका चौक्या आणि सीसीटीव्ही उभे करण्याचे विचाराधीन आहे.

4. शाळा सुरू होण्याच्या कालावधीत आणि शाळा वर्ग संपल्यानंतर शाळेच्या आजूबाजूला फेरी मारण्यासाठी त्यांच्या शाळेत सुरक्षा, मार्शल सोडण्याचे आदेश पीएमसी सर्व शाळांना लवकरच देणार आहे.

5. पीएमसी बाह्य एजन्सीची नेमणूक करेल. शाळा अथवा  महाविद्यालयांमध्ये नियमितपणे महिला वर्गाची सुरक्षा आणि कठोर परिस्थितीतून बचाव किंवा जागरूकता याविषयी कार्यशाळा सुनिश्चित करेल.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply