
पनवेल ः शहरातील साईनगर येथे नव्याने एम. डी. डेंन्सिस्ट्री हे डेंटल क्लिनिक सुरु झाले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी डेंटलच्या मालक डॉ. मनाली देवळे यांचे उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदीच्छा व्यक्त केल्या. उद्घाटनावेळी नगसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, नगरसेविका हेमलता म्हात्रे, अमोल आंबोलकर, श्री व सौ. माधुरी गणेश देवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कानपोली येथील साकव व रस्त्याच्या कामाचे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः तालुक्यातील कानपोली येथे रायगड जिल्हा परिषदेच्या ‘जिल्हा नियोजन 3054’ या निधीमधून साकव पूल आणि रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भुमीपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या कामाच्या भुमीपूजनावेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, बंडुशेठ गोंधळी, शामशेठ पाटील, संदिप तांडेल, प्रकाश खानावकर, अंकुश पाटील, प्रकाश खैरे, निलेश म्हात्रे, तुळशीराम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या वतीने शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन

पनवेल ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या वतीने शैक्षणिक प्रदर्शनाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका उज्वला कोटियन यांनी केले. प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन घाडगे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध कला कृती सादर केल्या. या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षिका निरजा मॅडम, संध्या अय्यर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अजित केळकर, विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper