Breaking News

पंचायत समितीची पदे आरक्षित करण्यासाठी सभा

अलिबाग ः जिमाका

रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. शासन ग्रामीण विभागाकडील प्राप्त अधिसुचनेनुसार ही सभा आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील  राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा प्रत्येकी एका प्रतिनिधीस पंचायत समिती सभापतीपदांच्या आरक्षणाच्या सभेस उपस्थित राहता येईल.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply