Breaking News

फुंडे हायस्कूलची सहल प्रतापगडावर

उरण : वार्ताहर       

रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील तु. ह. वाजेकर विद्यालयाची शैक्षणिक सहल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची ऐतिहासिक भेट असलेल्या प्रतापगडावर आयोजित करण्यात आली होती.  विद्यालयातून 168 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर विद्यार्थ्यांसमवेत 11 शिक्षक व एक माता पालक सदस्य या सहलीत सहभागी झाले होते.

सकाळी ठीक 4.30 वाजता गाड्यांनी फुंडे हायस्कूलच्या प्रांगणातून प्रस्थान केले. सुरुवातीला पाली येथील बल्लाळेश्वराचे  दर्शन, रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर शाखेला भेट, गडाच्या पायथ्याशी सहभोजन त्यानंतर सर्व विद्यार्थी जल्लोषात गडावर पोहचले. इतिहास शिक्षक एन.एल.गावंड, डी.डी.पाटील यांनी प्रतापगड किल्ल्याची तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि खानाच्या भेटीची माहिती सांगितली. त्यानंतर महाबळेश्वरमधील पंच नद्यांच्या संगमाचे दर्शन, प्रसिध्द ठिकाणांना भेटी, मग सहलीच्या परतीचा प्रवास सुरु झाला. पहाटे 3.30 वाजता गाड्या विद्यालयाच्या प्रांगणात आल्या. सहलप्रमुख आर.एल.प्रक्षाले, डी.डी.पाटील यांनी या सहलीचे नियोजन केले होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply