Breaking News

माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर एटीएम सेवा

माथेरान ः प्रतिनिधी

ऐन सुट्टीच्या हंगामात येथील एकमेव असलेल्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये नेहमीच पैशांची चणचण भासते. त्यामुळे येथील दस्तुरी नाका येथे अ‍ॅक्सिस बँकेचे नवीन एटीएम मशीन सुरू करण्यात

आले आहे.

या एटीएम सेवेचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, नगरसेवक-नगरसेविका त्याचप्रमाणे नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.युनियन बँकेचे एटीएम मशीन नेहमीच रेंजअभावी तसेच अपुर्‍या प्रमाणात रक्कम जमा असल्याने बंद पडत होते. त्यामुळे ऐन सुटीच्या वेळी विशेषतः शनिवार आणि रविवारी पर्यटकांना पैशांची सोय होत नव्हती. त्यामुळेच येथे दुसर्‍या सक्षम बँकेचे एटीएम असावे, अशी नागरिकांसह पर्यटकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. याकामी नगर परिषद गटनेते प्रसाद सावंत यांनी अ‍ॅक्सिस बँकेचे वरिष्ठ अधिकारी दीपक चंदने यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तूर्तास तरी पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply