पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे साकारलेल्या बसथांब्याचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23) करण्यात आले.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी, जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, पं. स. सदस्य तनुजा टेंबे, मनीषा मोरे, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, केळवणेच्या सरपंच अश्विनी संदीप घरत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, केळवणे पं. स. विभागीय अध्यक्ष हिरामण ठाकूर, ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील, चांगाजी पाटील, प्रमोद पाटील, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, तारा ग्रामपंचायतीचे सदस्य विद्याधर जोशी, दिघाटी ग्रामपंचायतीचे सदस्य मनोहर पाटील, स्मिता ठाकूर, वैशाली पाटील, अक्षता म्हात्रे, हर्षदा पाटील, भाजप युवा मोर्चाचे केळवणे पं. स. विभागीय युवा मोर्चा उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, नारायण ठाकूर, भरत गावंड, अरुण ठाकूर, प्रभाकर ठाकूर, संदीप पाटील, कृष्णा ठाकूर, विलास ठाकूर, नरेश ठाकूर, राकेश पाटील, राजेश ठाकूर, विकास पाटील, राजाराम पाटील, कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …
RamPrahar – The Panvel Daily Paper