Breaking News

‘आरटीपीएस’मध्ये रंगला क्रीडा महोत्सव

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)मध्ये रविवारी (दि. 22) वार्षिक क्रीडा महोत्सव रंगला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तर पारितोषिक वितरण भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
आरटीपीएसमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवात खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तसेच त्यांनी मानवी मनोरे रचून कवायती सादर केल्या. या महोत्सवास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक निलेश बावीस्कर, अभिमन्यू पाटील, नगरसेविका लीना गरड, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, आरटीपीएसच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रितीका दास (सीबीएसई बोर्ड), स्वप्नाली म्हात्रे (स्टेट बोर्ड), समन्वयक कुसुम प्रजापती, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, सुरेश ठाकूर, साधना पवार, नवनित मारू, अशोक पवार, दिनकर नलावडे, नितीन सुर्यवंशी, संतोष वाव्हळ, विपूल चौटालिया, शुभ पाटील, नरेश पांचाळ आदी उपस्थित होते. या वेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply