चिमुकल्या सईचे परेश ठाकूर यांच्याकडून कौतुक
पनवेल ः प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील बाळकूम येथील सई आशिष पाटील ही आठ वर्षांची चिमुकली आई एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळा येथून बाळकूम असा 120 किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत समाजातील विविध विषयांवर जनजागृती करण्याचे काम करीत आहे. त्या अनुषंगाने एकवीरा ते बाळकूम प्रवास करताना सई पनवेल येथे आल्यानंतर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चारुशीला घरत यांनी सईला पुष्पगुच्छ देत तिच्या अभिनव उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळू या, पर्यावरणाचा समतोल राखू या, असा संदेश देत सई पाटील एकवीरा देवस्थान ते बाळकूम असा 120 किलोमीटरचा सायकल प्रवास करीत आहे. या चिमुकलीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पनवेल येथे सईचे कौतुक करतेवेळी किशोर मोरे, शैलेश पाटील, हेमंत पाटील, विनायक खेर, सुधीर पोपेटा, हरिदास शेंडे, विचुंबेचे माजी सरपंच गणपत म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper