पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील वहाळ येथे स्व. रमणशेठ घरत मैदान प्रवेशद्वार आणि ओमसाई सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित स्व. सुरज स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) करण्यात आले.
या सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, रविशेठ पाटील, मधुकर ठाकूर, रवींद्र पाटील, सीताराम नाईक, केसरीनाथ दापोलकर, गिरीधर घरत, योगराज घरत, प्रीतम नाईक, वहाळच्या सरपंच पूजा समीर पाटील, चेतन घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभापती राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केेले.
Check Also
वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!
वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …
RamPrahar – The Panvel Daily Paper