Breaking News

मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जनजागृती

पनवेल : वार्ताहर

मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पनवेल शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 7) फेरी काढून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.

नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’ची पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी येत्या गुरुवारी (दि. 9) मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये प्रभागातील सर्वांनी सहभाग घ्यावा व आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यासाठी मंगळवारी शालेय विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली होती. स्वीप प्रोग्रॅम अंमलबजावणी पथकाच्या माध्यमातून ही फेरी काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी पनवेलकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply