Breaking News

इंधन बचत काळाची गरज -मोनिका वानखेडे

पनवेल : प्रतिनिधी

इंधन हे नैसर्गिक खजिना असून इंधन बचत ही काळाची गरज असल्याचे पनवेल आगाराच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक  मोनिका  वानखेडे यांनी गुरुवारी (दि. 16) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पनवेल आगारात मासिक इंधन बचत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले.          

एस. टी. महामंडळाच्या मुंबई विभागात येणार्‍या पनवेल आगारात 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत इंधन बचत महिना पाळण्यात येणार आहे. पनवेल आगारामध्ये गुरुवारी मासिक इंधन बचत  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास आगार व्यवस्थापक मोनिका वानखेडे, सहाय्यक वाहतुक अधिक्षक उदय जुईकर, कार्यशाळेचे प्रभारक एकनाथ पाटील, पनवेल आगारातील चालक/वाहक, यांत्रिकी कर्मचारी आणि पर्यवेक्षक उपस्थित होते.या वेळी आगाराच्या वरिष्ठ व्यवस्थापक मोनिका वानखेडे यांनी इंधन हे नैसर्गिक खजिना असून इंधन बचत ही काळाची गरज आहे, चालकांनी इंधन बचतीबाबत योग्य काळजी घेऊन उत्पन्न वाढीच्या दृष्टीने इंधन बचत करणे कसे महत्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले. आगारातील सहाय्यक वाहतुक अधिक्षक उदय जुईकर यांनी इंधन बचतीचे महत्व पटवून देऊन इंधन बचत कसे करावे याबाबत माहिती दिली. आगारातील कार्यशाळेचे प्रभारक एकनाथ पाटील यांनीही इंधन बचतीबाबत मार्गदर्शन केले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply