Breaking News

फुलराणीच्या हाती ‘कमळ’

सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
फुलराणी म्हणून ओळखली जाणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सायनाने बुधवारी (दि. 29) भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले. सायनासोबत तिची बहिण चंद्रांशू हिनेही या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत सायना नेहवालचा समावेश आहे. तिने ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे. 2015मध्ये ती जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. सायनाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटही येणार आहे.
‘भाजपशी जोडले जाणे मी माझे भाग्य समजते. माझ्यासाठी हे सर्व काही नवे आहे, पण मला राजकारणाबद्दल वाचायला आवडते. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मला खूप काही शिकायला मिळते. देशासाठी काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे’, असे सायनाने या वेळी सांगितले.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply