Breaking News

आंबेत संघ श्री घुमेश्वर चषकाचा मानकरी

म्हसळा ः प्रतिनिधी
तालुक्यातील घुमेश्वर (घुम) येथे शिवशक्ती क्रिकेट संघ आणि ग्रामविकास सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट स्पर्धेत आंबेत वलझारवाडीतील ज्ञानदीप बालमित्र मंडळ संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी अंतिम सामन्यात चरई खुर्द (ता. तळा) येथील श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ संघाला मात दिली.
स्पर्धेत घोडेघुम येथील सोमजाई क्रिकेट संघाने तृतीय, तर केलटे येथील श्री समर्थ क्रिकेट संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला. मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून संकेत डावरुंग (आंबेत) याची, तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राजन दळवी (चरई खुर्द) याची निवड करण्यात आली. विजेत्या संघांना व विशेष कामगिरी करणार्‍या खेळाडूंना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जाधव व समाजसेवक दीपक सारंगे यांच्या हस्ते झाले होते.  उपसभापती मधुकर गायकर यांनी संघ व खेळाडूंचे कौतुक केले.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply