


पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री छत्रपती विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज गव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक व अटल टिंकरिंग प्रयोगशाळा विभागप्रमुख रवींद्र शालिक भोईर यांची रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यातर्फे लाइफ वर्करपदी नुकतीच निवड करण्यात आली. मागील वर्षी रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने रायगड विभाग गुरुकुलप्रमुख पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अशा या गुणवंत शिक्षकाची संस्थेच्या लाइफ वर्करपदी निवड झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य आणि विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ भगत, स्थानिक स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, विद्यालयाच्या प्राचार्य डोईफोडे, उपमुख्याध्यापक चौरे, पर्यवेक्षक भर्णुके, रयत बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर पी. ए. कोळी, ज्युनिअर विभागप्रमुख पाटोळे तसेच सर्व पालक शिक्षक संघ, शालेय व्यवस्थापन समिती आणि विकास समिती सदस्य व सदस्या आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील भावी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper