नवी मुंबई : प्रतिनिधी
नेरूळमधील सीवूड्स येथे एका इमारतीला शनिवारी (दि. 8) लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले. त्यांना ऐरोली येथील बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सीवूड्स सेक्टर 44मधील सी होम्स इमारतीच्या 20व्या आणि 21व्या मजल्यावर सकाळी सातच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. इमारत गगनचुंबी असल्याने उंचीवरील ही आग विझवताना अनेक अडथळे येत होते. अखेर पाच तासांनंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले. त्यांच्यावर ऐरोली येथील बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper