Breaking News

सरसंघचालक मोहन भागवत रायगडमध्ये

किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांना अभिवादन

महाड : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व अखिल भारतीय संच मंगळवार (दि. 11)पासून तीन दिवसांच्या रायगड जिल्हा दौर्‍यावर आला असून, संघाची संच बैठक पहिल्यांदाच जिल्ह्यात होणार आहे. भागवत व सहकार्‍यांनी दौर्‍याच्या सुरुवातीला किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळी व होळीचा माळ येथील पुतळ्यापुढेनतमस्तक झाले.
सरसंघचालक भागवत यांच्यासह देशभरातील सहा सरसहकार्यवाह व प्रचारक प्रमुख यांची महत्त्वपूर्ण बैठक 13 फेबु्रवारीला माणगाव तालुक्यातील करंबेळी येथे होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी मंगळवारी किल्ले रायगडवर जाऊन अभिवादन केले, तर बुधवारी ते शिवथरघळला भेट देऊन दर्शन घेणार आहेत.

Check Also

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …

Leave a Reply