Breaking News

जाहिरातबाजीसाठी वृक्षतोड; रस्ते विकास महामंडळाचा प्रताप; ‘काम बंद’चे आदेश

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील कि मी.42 जवळ होर्डिंग, बोर्ड लावण्यासाठी कुठल्याही खात्याची परवानगी न घेता वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार खोपोलीतील पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे. खुद्द महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वृक्षतोड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार गेल्या दहा वर्षापासून प्रयत्नशील आहे. त्यासाठी मोठा निधीही खर्च केला जात आहे. मात्र  दुसरीकडे फळा फुलांनी बहरलेले वृक्ष शासनाची परवानगी न घेता तोडले जात आहेत. अशा प्रकारची वृक्षतोडीची घटना पर्यावरण प्रेमी व खोपोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. जाहिरातबाजीसाठी बोरघाटातील किमी.42जवळ राज्य रस्ते विकास महामंडळाचे कर्मचारी वृक्षतोड करीत असल्याचे या कार्यकर्त्यार्ंचे म्हणणे आहे. दरम्यान, हे वृक्षतोडीचे काम बंद करण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत.

वृक्षतोडीच्या घटनांमध्ये फक्त कागदोपत्री कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र वृक्षतोड करणार्‍यांवर मोठ्यातमोठी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वृक्षप्रेमी मनीष कवळे केली आहे.

बोरघाटात वृक्षतोड करण्यात येत असलेली जागा खाजगी मालकीची असली, तरी संबंधित ठेकेदाराने व एजन्सीने वृक्षतोड करण्यासाठी वनखात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेता या ठिकाणी वृक्षतोड करणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे

निर्देश देण्यात आले आहेत. -आशिष पाटील, वनाधिकारी, खालापूर

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply