वीज दरवाढीविरोधात कामगार संघटना आक्रमक

उरण : रामप्रहर वृत्त

जेएनपीटी वसाहतीमध्ये राहणार्‍या कामगारांना पुरविण्यात येणार्‍या विजेच्या दरात अन्यायकारक भरमसाठ वाढ केली. त्यासंदर्भात जेएनपीटी वर्कर्स युनियनने मुख्य सचिव यांची गुरुवारी त्यांच्या दालनात भेट घेऊन प्रशासनाची ही कृती बेकायदेशीर आहे हे पटवून देऊन परिपत्रक त्वरित रद्द करण्याची मागणी केली व सर्व मान्यताप्राप्त कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर यासंबंधी निर्णय घेण्याची जोरदार मागणी केली.

या वेळी वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी रवी पाटील, भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रकाश नाचरे, मनोज घरत, प्रमोद पाटील, जनार्दन बंडा, सूर्यकांत गायकवाड तसेच जेएनपीटी वर्कर्स युनियनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पाणंद रस्त्यांची सात-बारा उतार्‍यावर नोंद होणार -मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्षमुंबई ः रामप्रहर वृत्तराज्यात पाणंद रस्ते …

Leave a Reply