बीड : प्रतिनिधीआरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडी सरकारचे अधिवेशन मुंबईमध्ये होत असतानाच आता धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत 26 फेबु्रवारीला धनगर समाज सुंबरान आंदोलन करणार आहे. बीडमध्ये धनगर समाजाच्या राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना यशवंत सेनेचे संस्थापक भारत सोन्नर यांनी या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा दिला आहे.
Check Also
श्रीगणेशोत्सव आणि मनोरंजनक्षेत्र यांच्या नात्याची गोष्ट
आजच्या श्रीगणेशोत्सवात हमखास दिसणारी फिल्मी गोष्ट म्हणजे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या सेलिब्रिटीजनी …
RamPrahar – The Panvel Daily Paper