Breaking News

शरीरसंबंध ठेवून लग्नास नकार; रेवदंड्यात गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी

शरीरसंबंध ठेवून लग्नास नकार दिल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात घोटवडे येथील पीडित युवतीने तक्रार नोंदविली आहे.

अलिबाग तालुक्यातील घोटवडे येथे चोवीस वर्षीय युवतीचे  गावातील 32 वर्षीय युवकांशी प्रेमसंबंध जुळले. यावेळी तिला लग्न करण्याचे वचन देऊन घरी, वरसोली येथील बीचवर, मुरूड रोडवरील लॉजमध्ये शरीरसंबंध केले. त्यामुळे युवती गरोदर राहिली असता, या युवकांने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. दरम्यान, काही दिवसापुर्वी त्या युवकाचे दुसरीकडे लग्न ठरले, त्याबद्दल  मुलीने विचारणा केली असता घरच्याच्या संमतीने लग्न करीत असल्याचे सांगितले. त्यावेळी माझे घरचे लोकसुध्दा माझे लग्न जमवित आहेत, असे पीडित मुलीने सांगितले. तेंव्हा तू लग्न कशी करतेस, ते मी बघतो, अशी धमकी देऊन त्या युवकाने फसवणूक केली, असे घोटवडे येथील पीडित युवतीने रेवदंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर करीत आहेत.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply