Breaking News

चौलमध्ये दीड लाखाचा गुटखा जप्त

रेवदंडा : प्रतिनिधी

चौलमधील एका घरावर रेवदंडा पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकार्‍यांच्या समावेत शनिवारी (दि. 29) रात्री धाड टाकून सुमारे दिड लाख रूपये किमंतीचा गुटखा, पान मसाला व सुंंगधीत तंबाखू या प्रतिबंधक पदार्थाचा साठा हस्तगत केला. रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनिल जैतापुरकर, उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस कर्मचारी एस. ए. म्हात्रे, व्ही. एस. गायकवाड, एल. यू. जाधव तसेच अन्न सुरक्षा प्रशासन सहाय्यक आयुक्त विश्वजीत शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी दे. गो. वीर आदीनी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चौल चंपावती आळी येथील अरूण घरत यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात विमल गुटखा, विविध प्रकारचे पान मसाले, व सुंगधीत तंबाखू आदी एक लाख 57हजार 858 रूपये किमंतीचा माल हस्तगत केला. या प्रकरणी विश्वजीत शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रकाश मांगीलाल शर्मा (रा. पारनाका रेवदंडा) याच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हर्षद हिंगे करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply