Breaking News

पॉवर लिफ्टर जसविंदर बदेशा यांना स्पर्धेसाठी आर्थिक मदत  

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून प्रोत्साहन

पनवेल : रामप्रहर वृत्त
परदेशात होणार्‍या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड झालेले कळंबोली येथील जसविंदर बदेशा यांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे सचिव व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ग्लोबल पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने 7 मार्च रोजी युक्रेनमध्ये युरो अशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात जसविंदर बदेशा यांची निवड झाली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने जसविंदर यांना आर्थिक मदत करण्यात आली. त्यांना धनादेश देतेवेळी भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग, कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply