पनवेल मनपाचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीत

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा  अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 6) स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. पनवेलकरांना हा अर्थसंकल्प काय देणार याबाबत उत्सुकता लागली आहे. 

पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी सकाळी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख हे स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील यांना सादर करून समितीपुढे मांडतील. पनवेल महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा, रस्ते, अग्निशमन सेवा, शहर सफाई, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण, वंचितांचा विकास, पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत क्षेत्राचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून कोणत्या तरतुदी करण्यात येणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply