Breaking News

पेणमध्ये होलिकोत्सवात उंचच उंच होळ्या

पेण : प्रतिनिधी

उंचच उंच होळ्या पेण तालुक्यातील होलिकोत्सवाचे एक आकर्षण ठरत आहेत. शहरातील कोळीवाडा आणि कुंभार आळी या दोन ठिकाणच्या होळ्या सर्वांत उंच असल्याने त्या सर्वात जास्त आकर्षित ठरत आहेत. होलिकोत्सवाच्या 8 ते 10 दिवस अगोदरच शेजारील जंगलात जाऊन पेणमधील नागरिक होळी आणतात. त्या होळीला सुशोभीत करून या होळ्या उभ्या केल्या जातात. पेण शहरातील कोळीवाडा, कुंभारआळी, नंदिमाळ नाका, चिंचपाडा, कौंडाळ तळे, फणस डोंगरी यांसह अन्य भागात शेकडो होळ्या उभारल्या जातात. या होळया पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. कोळी बांधवांचा होळी हा सर्वात महत्त्वाचा सण असल्याने पेण कोळीवाड्यातील महिला कोळी गीते आणि होळीच्या गीतांवर नृत्य करतात. ही नृत्ये पाहण्यासाठी शहरातील नागरिक या ठिकाणी गर्दी करतात. होलिकामातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आणि आपल्यातील वाईट गुण किंवा वर्षभरात घडलेल्या चुका अर्पण करून मध्यरात्री 12 वाजताना या होळ्यांना अग्नी दिला जातो. अशा या पेणमधील होलिकोत्सवात एक वेगळे आकर्षण ठरत असून संपूर्ण तालुक्यातील नागरिक पेण शहरात या होळ्या पाहण्यासाठी गर्दी करतात.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम

स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार, लोकप्रतिनिधी सत्कार, गुणीजनांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकऱ्यांचे द्रष्टे …

Leave a Reply