Breaking News

राजिपच्या अर्थसंकल्पात नऊ कोटींची घट

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेचा 2020-21 सालचा 63 कोटी 69 लाख 67 हजार रुपयांचा मूळ महसुली, तर 2019-20चा 11 कोटी 91 लाख 46 हजार रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड. नीलिमा पाटील यांनी सभागृहात मांडला. तो मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या महसुली अर्थसंकल्पात नऊ कोटींनी घट झाली आहे. 2019-20चा मूळ महसुली अर्थसंकल्प 72 कोटी 34 लाख 28 हजार 214 रुपयांचा होता. 

रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 11) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात झाली. राजिप अध्यक्ष योगिता पारधी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. या सभेत अ‍ॅड. पाटील यांनी अर्थसंकल्प सादर केला. उपाध्यक्ष, सभापतींसह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड सभेला उपस्थित होते.अ‍ॅड. पाटील यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, भाजपचे प्रतोद अमित जाधव, शेकापचे प्रतोद अ‍ॅड. आस्वाद पाटील, माजी सभापती नरेश पाटील, चित्रा पाटील, सुरेश खैरे, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत कळंबे, बाजीराव परदेशी, अनसूया पादीर आदींनी भाग घेतला. या सर्व सदस्यांनी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधीचा योग्य वापर करावा, तसेच जिल्हा परिषदेचा महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना केल्या.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply