Breaking News

क्षुल्लक कारणावरून मुलाकडून आईची हत्या

महाड ः प्रतिनिधी

आईने पुण्याला जाण्यासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या मुलाने आपल्या वृद्ध आईची क्रूरपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी महाड तालुक्यातील नागाव रेवतळे फाटा येथे घडली. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. महाड तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुकर चंद्रकांत सकपाळ (32) याला पुण्याला जायचे असल्याने त्याने आई शकुंतला सकपाळ (70) हिच्याकडे प्रवास व अन्य खर्चासाठी पैशांची मागणी केली होती, मात्र त्याच्या आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मधुकरने आपल्या आईला शिवीगाळ करून शरीराच्या गुप्त भागावर तसेच डोके भिंतीवर आपटून मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे जखमी झालेल्या शुकंतला यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर नागाव रेवतळे फाटा येथील पोलीस पाटील श्रावणी सकपाळ यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी मधुकर सकपाळला मध्यरात्री अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे करीत आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply