पनवेल ः वार्ताहर : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना व्हायरसमुळे नगदी नोटा, वस्तू यांची आदान-प्रदान होणार्या ठिकाणी मास्क व हातमोजे वापरण्याची सक्ती करावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नगरसेवक विजय चिपळेकर यांनी म्हटले आहे की, महानगरपालिका क्षेत्रात येणारे मॉल्स, हॉस्पिटल्स, लहान मोठी दुकाने ज्या ठिकाणी नगदी नोटा, वस्तू यांचे आदान-प्रदान होते, तेथील कर्मचारी- अधिकारी व कामगारांना मास्क व हातमोजे वापरण्याची सक्ती करावी, जेणेकरून करोना व्हायरसचा प्रसार आपल्याला रोखता येईल. यासंदर्भात आदेश काढावेत, अशी मागणी नगरसेवक विजय चिपळेकर यांनी केली आहे.