Breaking News

नागरिकांनी उभारली निरोगी आरोग्याची गुढी

पनवेल : रामप्रहर वृत्त
गुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 24) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा नागरिकांनी निरोगी आरोग्याची गुढी उभारल्याचे चित्र दिसून आले.  
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षारंभ होतो. भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. केवळ धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिकच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही हा मास उत्साहवर्धक असतो, परंतु या वर्षी संपूर्ण जगावर कोरोना चे सावट आहे. त्यामुळे आपला देशही सध्या लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर पाडव्यानिमित्त निघणार्‍या शोभायात्राही रद्द करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी विधीवत पूजा-अर्चा करून व गुढी उभारून साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला. सोशल मीडियावरही घरी राहून आरोग्याची काळजी घेत हा सण साजरा करण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply