Breaking News

उरणमध्ये नगरपरिषदेतर्फे जनजागृती

उरण : वार्ताहर

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूबद्दल अधिक माहिती व्हावी, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी त्यासबंधी उरण शहरात बॅनर लावलेल्या गाड्या फिरविल्या जात आहेत. उरण शहरात धुरांडी करण्यात येत आहे. जंतूनाशक फवारणी सुरु आहे. किराणा मालाच्या दुकाना समोरील बाजूस तीन फुट चौरस अशी पांढर्‍या रंगाची मार्किंग करण्यात आली आहे जेणेकरून किराणा दुकानात जाता वेळी रांगेत नागरिक उभे राहतील व दोन व्यक्ती मधील अंतर तीन फुटाचे राहील अशाप्रकारची रचना करण्यात आली आहे. या जनजागृतीमध्ये उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, नगरसेवक कौशिक शाह, आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी, सफाई कामगार आदींचे सहकार्य मिळत आहे. उरण नगरपरिषदेच्या वतीने उरण शहरात गाड्यांद्वारे घोषणाबाजी करण्यात येत होते. त्यात घाबरून जाऊ नका, सतर्क रहा, स्वच्छता राखा, आपल्यांना लागणार्‍या जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना ठरवून दिलेल्या वेळेतच सामान खरेदी करावे. दुकानात जाताना रांगेचा फायदा घ्या, रांगेत उभे असताना तीन फुटाचे अंतर ठेवा. केंद्र व राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे नियोजन केले आहे. आपल्याला व दुसर्‍यांकडून आपल्याला संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्या. किराणा दुकानात वस्तू खरेदी करायला जाताना घरातील एकच व्यक्तीने जाऊन खरेदी करावी, वस्तू खरेदी करताना वेळेचे भान ठेवा. खरेदी केल्यानंतर इतरत्र फिरू नये लगेच थेट घरी यावे, एकमेकांचा संपर्क टाळावा. अशाप्रकारची जागृती करताना नागरिकांना सांगण्यात येत होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply