Breaking News

खांदा कॉलनीत निर्जंतुकीकरण

नगरसेविका कुसुम पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचे प्रयत्न

कळंबोली : प्रतिनिधी

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खांदा कॉलनी मधील विविध सोसायटीमध्ये धूरफवारणी व जंतुनाशक फवारणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसुम गणेश पाटील व माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या प्रयत्नातून करण्यात आली. कोरोनाच्या विषाणूने जगात थैमान घातले असून या महामारीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजना काही सामाजिक बांधिलकी असलेल्या नागरिकातून राबविल्या जात आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसुम पाटील व माजी नगराध्यक्ष गणेश पाटील यांनी कोरोनावर प्रतिबंध व नागरिकांची कोरोना सारख्या संसर्ग विषाणूपासून सुटका करण्यासाठी खांदा कॉलनी सोसायटीमधील परिसर निर्जतुकरण करण्यात आले. या वेळी सोसायट्यामधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply