अलिबाग : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिकी-ए-जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 14 जणांनी सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या संमेलनात भाग घेतलेल्यांपैकी देशभरातील 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे रायगडकरांची डोकेदुखी वाढली आहे. या 14पैकी एक जण जिल्ह्यात परतलेला नाही आणि एकाचा शोध घेण्यात येत आहे, तर उरलेल्या 12 जणांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. हे सर्व जण पनवेलचे रहिवासी असल्याचे वृत्त आहे. कोरोनाचा फैलाव इतरत्र वेगाने होत असताना रायगड जिल्ह्यात कोरोना बर्यापैकी नियंत्रणात होता, मात्र आता रायगडकरांना चिंता व्यक्त होत आहे.
Check Also
वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!
वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …
RamPrahar – The Panvel Daily Paper