Breaking News

नगरसेवक मनोहर म्हात्रेंच्या पुढाकाराने मोकळ्या प्लॉटची स्वच्छता

पनवेल : वार्ताहर

सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणी पनवेल महानगर पालिकेमार्फत धूर फवारणी, औषध फवारणी व स्वच्छतेकडे विशेष लक्ष

दिले जात आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मधील बंदर रोड येथील साई दर्शन अपार्टमेंट याठिकाणी एका मोकळया प्लॉटवर घाणीचे साम्राज्य पसरले होते. अनेकदा सांगून देखील याठिकाणी स्वच्छता होत नव्हती. अखेर येथील नागरिक भावना सादराणी यांनी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांना संपर्क करून याबाबत सांगितले व याठिकाणी स्वच्छता करून घेण्याबाबत विनंती केली त्यानुसार लगेचच कार्यतत्पर नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी पनवेल महापालिकेकडून या प्लॉटची साफसफाई करून घेतली. याबाबत येथील नागरिकांनी मनोहर म्हात्रे यांचे आभार मानले व कोरोनासारख्या परिस्थितीतही लोकांचे सेवा करणारा नगरसेवक आमच्या प्रभागात आहे याबाबद्दल नगरसेवक मनोहर म्हात्रे यांचे कौतुकही केले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply