पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात मंगळवारी (दि. 14) कोरोनाचे तीन नवीन रूग्ण समोर आले. यातील दोघे पनवेलमध्ये आढळलेल्या ओलाचालकाच्या घरातील सदस्य असून, एक व्यक्ती घोट गावातील आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 30, तर रायगड जिल्ह्याचा आकडा 32वर गेला आहे. पनवेल शहरातील इस्रायल (विश्राळे) तलाव परिसरात राहणार्या कोरोनाबाधित ओलाचालकाच्या घरातील 10 सदस्यांची तपासणी केली असता, त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह असून सहा सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर दोन सदस्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. याव्यतिरिक्त घोट गावातील एक व्यक्ती 23 मार्चपासून स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल होता. त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या आई-वडिलांची तपासणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper